वेडात मराठे..
शिवरायांनी गुलामीत पिचलेल्या महाराष्ट्राला मान ताठ करून उभे राहायला शिकवले. सोळाव्या वर्षी डोळ्यात स्वराज्याची स्वप्ने घेऊन त्यांनी सुरु केलेल्या महायज्ञात कित्येक वीरांच्या रक्ताची आहुती पडली. स्वाभिमान, राजांचा शब्द आणि येणाऱ्या पिढीसाठी उद्दात्त स्वराज्याचे स्वप्न डोळ्यांत घेऊन कित्येकांनी जीव तळहातावर घेऊन त्यात उड्या घेतल्या.. सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा बहादूर सरदारांच्या बलिदानाची कहाणी ही मराठ्यांच्या इतिहासातली स्वाभिमानी, निष्ठावंत आणि ध्येयवेड्यां वीरांच्या रक्ताने रंगलेली भळभळती जखम आहे. १६७३ च्या सुरवातीला आदिलशाही सरदार बहलोल खानाने स्वराज्यावर आक्रमणे करून रयतेचा छळ मांडला होता. राजांनी त्याला रोखण्यासाठी सरसेनापती प्रतापरावांना चालून जाण्याचे आदेश दिले. प्रतापरावांचे मूळ नाव कुडतोजी गुजर असे होते, मिर्झा जयसिंगाच्या स्वारी दरम्यान त्यांनी खूप बहादुरी दाखवली. राजांनी त्यांना सरनौबत म्हणजेच सरसेनापती बनवून 'प्रतापराव' अशी पदवी दिली, हे बहुतेक साल्हेर च्या लढाई नंतर घडले असावे. नेसरी जवळ प्रतापरावांनी खानाला वेढले व त...