शेक्सपिअर आणि तुकोबा
आज जागतिक पुस्तक दिवस. सकाळी सहज म्हणून माझ्या छोटयाश्या पुस्तकांच्या रॅक लक्ष गेले तर दिसले की हे दोघे अगदी शेजारी मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि जणूकाही कवर्स च्या आडून व्यवस्थित गप्पा मारत आहेत! मग सहज विचार केला की जर हे दोघे खरच जर भेटले असते तर काय हितगुज झाले असते? माझ्या एवढ्याश्या डोक्यात बसणारा हा विचार नक्कीच नाही.. एक देहूचा वाणी, दुसरा मध्ययुगीन इंग्लंड मधला एस्टेट ब्रोकर, पाहिलं तर करोडो मर्त्य दीव्यांसारखे काळाच्या ओघात हे दोघेही विझून गेले असते पण पण.. लेखणी मध्ये आली आणि अणू रेनुसारखा थोबडा असणारा तुकया आकाशाएवढा झाला; वर्विक्शायर नामक कुठल्याश्या काऊनटीत जन्मलेला विल्यम जगभरातल्या तमाम लेखक-कवीजणांसाठी मायबाप झाला! दोघांचाही काळ पाच पन्नासएक वर्षे पुढे मागे म्हणजे जवळपास सारखाच.. शेक्सपिअरला मानवी मानवी मनात चाललेल्या गुंत्यांची आणि खळबलीची भयंकर ओढ! त्याने जुन्या ग्रीक शोकांतिकांच्या नरड्यावरच घाव घातल...