सचिन देव बर्मन आणि 'देव'
 
  जर  कुणाला  हिंदी  चित्रपट  संगीताची  कथा  दोन  शब्दांत  लिहायची  असेल  तर  ती  सचिनदा  आणि  देव  आनंद  ह्या  फक्त  दोन  ध्रुवांभोवती  गुंफली  जाऊ  शकते !     खरं  म्हणजे  त्रिपुराच्या  राजघराण्यात  वाढलेल्या  सचिनदाना  संगीताची  गोडी  लागावी  आणि  त्या  अंकुराचा  . वटवृक्ष  व्हावा  हा  एक  अद्भुत  चमत्कार  होता  पण  तो  घडला ! आकाशात  बसलेल्या  गंधर्वमंडळींना  कदाचित  त्या  राजपुत्राच्या  प्रतिभेची  कल्पना  असावी , म्हणूनच  राजघराण्याच्या  विरोधात  जाऊन  गाणे  शिकण्याचे  धाडस  त्यांनी  दाखवले . १९३०  च्या  दशकात  त्यांनी  रेडिओ  आणि  बंगाली  संगीतात  भरपूर  मुसाफ़िरी  केली  आणि  १९४४  मध्ये  अशोक  कुमारांच्या  काही  चित्रपटांसाठी  संगीत  देण्यासाठी  मुंबई  गाठली . पुढील  काही  वर्षात  त्यांना  यश  मिळालेही  पण  हळव्या  मनाच्या  बर्मन  दादांना  मुंबईची  स्पर्धा  रुचली  नाही  आणि  ते  . कलकत्त्याला  परत  जाण्यासाठी  अगदी  रेल्वेमध्ये  बसलेही  होते  पण  तसे  होणे  नव्हते , त्याना  मनधरणी  करून  परत  नेण्यात  आले  आणि  पुढचा  इतिहास  आहे !     देव  आनंद  - लाहोर  वरुन  मुंबईमध्ये  ४०  च...
