सचिन देव बर्मन आणि 'देव'
जर कुणाला हिंदी चित्रपट
संगीताची कथा दोन
शब्दांत लिहायची असेल तर
ती सचिनदा आणि
देव आनंद ह्या
फक्त दोन ध्रुवांभोवती
गुंफली जाऊ शकते!
खरं म्हणजे त्रिपुराच्या राजघराण्यात
वाढलेल्या सचिनदाना संगीताची गोडी
लागावी आणि त्या
अंकुराचा .वटवृक्ष व्हावा हा
एक अद्भुत चमत्कार
होता पण तो
घडला! आकाशात बसलेल्या
गंधर्वमंडळींना कदाचित त्या राजपुत्राच्या
प्रतिभेची कल्पना असावी, म्हणूनच
राजघराण्याच्या विरोधात जाऊन गाणे
शिकण्याचे धाडस त्यांनी
दाखवले. १९३० च्या
दशकात त्यांनी रेडिओ
आणि बंगाली संगीतात
भरपूर मुसाफ़िरी केली
आणि १९४४ मध्ये
अशोक कुमारांच्या काही
चित्रपटांसाठी संगीत देण्यासाठी मुंबई
गाठली. पुढील काही वर्षात
त्यांना यश मिळालेही
पण हळव्या मनाच्या
बर्मन दादांना मुंबईची
स्पर्धा रुचली नाही आणि
ते .कलकत्त्याला परत
जाण्यासाठी अगदी रेल्वेमध्ये
बसलेही होते पण
तसे होणे नव्हते,
त्याना मनधरणी करून परत
नेण्यात आले आणि
पुढचा इतिहास आहे!
देव आनंद - लाहोर वरुन
मुंबईमध्ये ४० च्या
दशकात नशीब आजमवण्यासाठी
आलेला तरुण, पण
मुंबई मध्ये त्याला
ब्रेक मिळेना. काही
वर्षे .छोट्या मोठ्या नोकर्या, छोट्या
भूमिका व काही
लोकांशी ओळखी ह्याशिवाय
त्याच्या हाती काही
लागले नाही. मग
एक दिवस लाहोर
ला परत जाण्यासाठी
त्याने ट्रेन पकडली, पण
कोठेतरी ओळख झालेल्या
अशोक कुमारानी त्याला
परत नेले आणि
'जिद्दी' ह्या आपल्या
सिनेमा मध्ये देवला नायक
बनवले!
देव आनंदच्या नवकेतन बॅनर
साठी सचिनदांनी पहिल्यांदा
'अफसर' ला संगीत
दिले आणि पुढची
चोवीस वर्षे नवकेतनचा
चित्रपट आणि बर्मनदांचे
संगीत हे समीकरण
बनले.
बाजी, जाल, टॅक्सी
ड्रायवर, मुनिमजी, पेयिंग गेस्ट,
सोलवा साल, काला
बाजार, बात एक
रात की, तेरे
घर के सामने,
गाईड, ज्वेल थीफ,
प्रेम पुजारी.. पन्नास आणि साठच्या
दशकामधले हे सुमधुर
संगीत असलेले चित्रपट,
एका पेक्षा एक
सुंदर सांगीतिक अनुभव
आहेत!
सचिनदांचे संगीत काळाच्या चौकटीत
कधीच बसणारे नव्हते.
जितका त्यांची शास्त्रीय
संगीतावर आणि बंगाली
लोकसंगीतावर पकड होती,
तितकेच त्यांचे वेस्टर्न वरती
प्रेम होते, त्यांचे
संगीत प्रवाही होते
म्हणून आजही ते
आउटडेटेड वाटत नाही.
त्यांच्या संगीतामध्ये मूड्स दडलेले
असतात, एकाच चित्रपटात
ते विविध .जॉनर
वेगवेगळ्या मूड्स मध्ये वेगवेगळ्या
गायकांकडून गाउन घेत,
त्यामुळे त्यांचे संगीत कधीच
एकसुरी झाले नाही.
हरहुन्नरी किशोर कुमारला त्यानी
देवचा आवाज बनवला.
किशोर कुमारला आराधना
मधून त्यांनीच शिखरावर
नेऊन बसवले पण
ब्लॅक अँड व्हाईट
स्क्रीनवरचा देव आणि
त्याला किशोरचा आवाज - अतुलनीय!
पेईंग गेस्ट मधले खट्याळ
'छोड दो आंचल'
असो किंवा तीन
देवीया मधले चार्मिंग
'ख्वाब हो या
कोई हकिकत', देवचा
नायिकेभोवती पिंगा घालणारा नायक
किशोरने अचूक टीपला!
मोहम्मद रफी हा
देवाने केवळ स्वतः
गाता येत नसावे
म्हणून आपल्यासाठी पाठवलेला देवदूत
होता. सचिनदानी जर
देवच्या हॅपी गो
लकी इमेज साठी
किशोरला वापरले असेल तर
'अपसेट' देव साठी
रफी साहेबांइतका तरल
आवाज स्वाभाविक होता.
गाईड मधले अजरामर
गायकीचा नमुना असलेले 'दिन
ढल जाए' असो
की आशा भोसले
सोबतचे 'अच्छा जी मैं
हारी चलो मान
जाओ ना' असो,
रफी साहेबानी त्यांच्या
गळ्यातली नशीली तार देव
साठीच राखून ठेवली
होती! हिंदी सिनेसंगीतामधली
काही अजरामर डुयेट्स
'दिल पुकारे आरे
आरे', 'तेरे मेरे
सपने' असो किंवा
बेधुन्द 'खोया खोया
चांद' असो पडद्यावरचा
देव आणि दैवी
आवाजात गाणारे रफी - आजही
'सिनॉनिमस' आहेत.
हेमंतकुमारांना
हिंदीत आणण्याचे श्रेयही सचिनदांना
जाते - देव साठी! सोलवा
साल मधले 'हैं
अपना दिल तो
आवारा' आणि ती
हारमॉनिका किंवा 'बात एक
रात की' मधले
हॉँटिंग 'ना
तुम हमे जानो',
हेमंतदाच्या खर्जातल्या आवाजाला बर्मन्दानि
देवसाठी अचूक वापरले.
जरी रफी आणि
किशोर देव आनंदसाठी
ठरलेले आवाज होते
तरी सचिनदानी गाण्याला
भाव देणारे गायकच
नेहमी वापरले. 'टॅक्सी
ड्रायवर' मधले तलत
मेहमूदच्या तरल गळ्यातले
'जाए तो जाए
कहाँ' दुसर्या कुणी
इतक्या उत्कटतेने कदाचितच गायले
असते!
सचिनदा आणि देव
आनंद यांची गाणी
म्हणजे वेगवेगळ्या इमोशन्सचा रंगीबेरंगी
कॅन्वस आहे! तुमचा
मूड जो आहे,
त्यानुसार गाणे उचला,
ते तुम्हाला मन्त्रमुग्ध
करेल हे नक्की!
बाजी साठी साहिर
लुधियानवि ने एक
सुंदर गजल लीहली
होती - सचिनदानी तिला क्लब
सॉँग बनवले, पण
काय बनवले .. 'तद्बीर
से बिगडी हुई
तक्दीर बना ले,
अपने पे भरोसा
है तो यह
दाव लगा ले'
.. पडद्यावर देवला एक शेवटचा
डाव आजमवण्यासाठी आर्जवणारी
गीता बाली आणि
गीता दत्त चा
आवाज!
जेव्हा गीता 'टूटे हुए
पतवार है कश्ति
के हम तो
क्या, हारी हुई
बाहो को पतवार
बना ले' पर्यंत
येते तेव्हा आपणही
एक 'दाव' लावण्यासाठी
तयार झालेलो असतो!
Comments
Post a Comment