Posts

Showing posts from January, 2017

ती सध्या काय करते?

Image
पाऊस धो धो कोसळतोय. सकाळपासून जणू काही आकाशाने आपली पोतडी ओलेत्या जमिनीवर रिती करावी तशी झड लागली आहे.. ओल्या रस्त्यांवर फुटणारे टपोरे थेंब येणारी जाणारी वाहने निर्दयीपणे आपल्या पायांखाली तुडवत आहेत, पण त्या बिचारया थेंबांना त्याचे काही नाही! विजांच्या नर्तनात ते लागोपाठ निसरडया रस्त्याला आहुती जात आहेत! मी आपला केव्हापासुन बस स्टॉपच्या शेडच्या आडोश्याने ही पावसाळी गम्मत पाहतोय! बस अशीच लेट करत राहो असे वाटत राहते. खरं तर मला पाऊस खुप आवडतो. वर्षभर तो असाच धो धो का पडत राहत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र ढग देत नाहीत.. भस्कन् अंगावर आल्यासारखा अक्राळ विक्राळ आवाज काढत जाणारा डम्पर शेडच्या पागोळीची धार थोडीशी माझ्या अंगावर रीती करुन मात्र जातो! एक छत्री लगबगीने डबक्यांना चुकवत शेडच्या आडोश्याला येते. क्षणभर मला हा शेड वाळवंटातल्या एओसिस सारखा वाटायला लागतो! पण क्षणभरच, छत्रीला चुकवून आलेल्या काही चुकार थेंबांना हुसकावून लावणाऱ्या केसांची बट माझे लक्ष वेधुन घेते.. क्षणभर! आपल्या ओलेत्या केसांना सरळ करण्यासाठी ती मान वळवते.. एक विज लखकन् माझ्या मेंदुतुन आरपार जाते.. ती.. ती...