जो वादा किया वो निभाना पड़ेगा
 
    जो वादा किया वो निभाना पड़ेगा  ---------------------------------------------------  सकाळची वेळ असते. ऑफिस, मीटिंग्स, मेल्स.. डोक्यामध्ये कामाचा ऑलरेडी  पिंगा चालू झालेला असतो. सिग्नलवर 'काय हे ट्रॅफिक' चा कटकट राग अलापून एक  दोनदा घड्याळामध्ये वेळही पाहून होते.  आणि अचानक कुठल्यातरी ट्रकच्या  रेडिओवर विविध भारतीची ती ओळखीची ओळ ऐकू येते.. 'आईए अब सुनते है फिल्म ताज  महाल का इक गाना जो लिखा है साहिर लुधियानवी ने, धून बनाई है संगीतकार  रोशन ने और इसे गाया है लता मंगेशकर और मोहम्मद रफी ने'.. माझे कान जागे  होतात.. मोहम्मद रफी म्हणजे दैवत.. आणि त्यांची गाणी म्हणजे भक्ती..  बासरी आणि सारंगी ची मंत्रमुग्ध सुरावट संपते आणि रफी साहेबांचा आर्जव  करणारा स्वर 'जो वादा किया वो निभाना पडेगा.. रोके जमाना चाहे रोके खुदाई  तुम को आना पडेगा..' गाऊ लागतो..  एका मिनिटापूर्वी कैदे सारखे वाटणारे  ट्रॅफिक आता पुढची 3-4 मिनिटे ढिम्म हलले नाही तरी चालेल असा विचार शिवून  जातो.. सिग्नल सुटतो पण माझा मूड मात्र सेट होतो.. दिवसभर 'जो वादा'  डोक्यामध्ये वाजत राहते.. संध्याकाळी मग म...