Nagraj - Narrator with the mirror!

सैराट आणि फँड्री बद्दल एव्हाना खुप बोलले गेलेय. पण दोन्ही चित्रपट काळजीपुर्वक पाहिल्यावर नागराजचा आणखी एका ब्रिलियंस ध्यानात येतो. नागराजने दोन्ही चित्रपटांत छोट्याश्या भूमिका केल्या आहेत, नव्हे त्याने दोन्हीकडे एक आरसा दाखवणाऱ्या निवेदकाचे काम केले आहे. फँड्री मधला जब्या चंक्याचे त्याच्या स्वैर दिवसातले प्रतिबिंब आहे. जब्याच्या प्रत्येक अडखळणाऱ्या पावलाला आणि बसणाऱ्या ठेसेला चंक्याची दिशाहीन आणि 'वड पाचची' म्हणत सगळ्या जुनाट जखमा नशेत बुडवनारी फ्रेम आहे.. जब्याचे हतबल भविष्य चंक्या जगलेला आहे आणि दिग्दर्शक नागराजचा क्यामेरा आरसा आहे.. आपल्यासाठी! कट टू - सैराट इथे नागराज ए.का. निवेदकाला नाव नाही (की आहे?) तो असाच काही फ्रेम्स मध्ये डोकावतो. त्यातली एक फ्रेम आपल्याला पुन्हा नागराज इथे पण आरश्यावाला निवेदक असल्याची आठवण करुन देतो. जेव्हा परश्या 'याड लागलं' च्या धुंदीत गावतून जात असतो तेव्हा हा निवेदक सलून मध्ये बसलेला दिसतो आणि बाजूचा आरसा परश्याचे आनंदी प्रतिबिंब दाखवतो. पण नागराज च्या चेहऱ्यावर सगळे हैप्पी गो लकी जात असताना काळजी साफ़ दिसते.. इथे ...